MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. ज्या चेतापेशी आवेगाचे वहन ज्ञानेंद्रियांकडून म्हणजे संवेदनशील भागाकडून मेंदू व मेरुरज्जूकडे करतात त्यांना संवेदी चेतापेशी असे म्हणतात. ब. ज्या चेतापेशी आवेगाचे वहन मेंदू व मेरुरज्जूकडून स्नायू व ग्रंथीसारख्या प्रेरक अवयवांकडे करतात त्यांना प्रेरक चेतापेशी असे म्हणतात.
A.अ, ब दोन्ही योग्य
B.फक्त अ योग्य
C.फक्त ब योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: A