MPSC PYQAptitudemarathi
पूर्णतया वेगळी जीवनशैली असलेल्या तरुणांकडून होणाऱ्या मतदानाला लागलेली उतरती कळा प्रामुख्याने निवडणुकांत मतदाराच्या संख्येला लागलेल्या ओहोटीला कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण केले जाते. वयस्क लोक मतदान करण्याची शक्यता अधिक असते. जर हीच प्रथा चालू राहिली तर मतदारांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बहुसंख्यांच्या इच्छा निर्देशित केल्या जाणार नाहीत आणि शासन शासन करण्याचा अधिकार आहे असे म्हणता येणार नाही, अशा स्थितीला (आपण) पोहोचण्याची शक्यता आहे. लोकांच्या इच्छांची दखल घेतली जाण्यासाठी समाजाने पारंपरिक निवडणुकींना पर्याय शोधणे गरजेचे आहे. वरील युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा.
A.निवडणूक ही सर्व लोकशाही देशांत शासन निवडीसाठी उत्तम प्रकारे स्थापित झालेली एकमेव प्रक्रिया आहे.
B.निवडणुकीत मतदान करण्यापेक्षाही तरुण व्यक्ती सामाजिक माध्यमांच्या मदतीने दबाव गटांत सामील होण्याची शक्यता अधिक आहे.
C.दूरस्थ निवासी स्थानांमुळे महाजालाद्वारे वा पोष्टाद्वारे मतदानाचा पर्याय वापरण्यात समस्या येण्याची शक्यता आहे.
D.ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे.
Correct answer: D